शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

बुद्धिबळातील सोंगट्या आणि त्यांच्या चाली | Chess Pieces and How They Move - in Marathi


राजा (King) चित्र ६
राजा (King)

बुद्धिबळ हा रोमांचक तसाच तो शिकायला हि सोपा आहे. ८x८ च्या पटावर ६४ चौरसांमध्ये आणि ३२ सोंगट्यां सोबत हा खेळ खेळला जातो व खेळ जिंकण्यासाठी राजा (King) ला 'शह आणि मात' (Check and Mate)  द्यावं लागतं. म्हणून राजा (King) हा सर्वात महत्वाचा आहे पण कमी शक्तीशाली सुद्धा आहे. राजा (King) हा उभ्या, आडव्या आणि तिरप्या दिशेने एकच चौरस जाऊ  शकतो. त्याच्या मार्गात येणाऱ्या विरोधी खेळाडूच्या सोंगट्यांना तो मारू शकतो. दोन्ही राजे एकमेकांच्या जवळ येत नाहीत त्यांच्यात किमान एक चौरासाचा अंतर ठेवावे लागते अगदी तिरप्या दिशेने सुद्धा एक चौरस अंतर असते. चित्र ६ मध्ये दिलेल्या राजाच्या भोवतालचे हिरवे वर्तुळ हे त्याची पुढच्या चाली दर्शवतात आणि निळी वर्तुळे ही दोघांतील ठेवण्यात येणारे किमान अंतर दर्शवतात.

राणी (Queen) चित्र ७
वजीर, राणी (Queen)


वजीर, राणी किंव्हा इंग्रजीत Queen म्हणा. राजा हा सर्वात महत्वाचा परंतु राणी (Queen) हि सर्वात शक्तिशाली सोंगटी आहे. राजा प्रमाणेच राणीही उभ्या, आडव्या आणि तिरप्या दिशेने जाऊ शकते. तथापि राणी हि राजाच्या विपरीत, प्रत्तेक दिशेने जास्तीत जास्त पुढे जाऊ शकते परंतु ती कोणत्याही सोंगट्यां (pieces) वरून उडी मारू शकत नाही. तिच्या मार्गात येणाऱ्या विरोधी खेळाडूच्या सोंगट्यांना ती मारू शकते. चित्र ७ मध्ये राणीच्या चाली दिल्या आहेत तसेच ती एखाद्या सोंगटीला कशी मारू शकते ते दाखवले आहे आणि त्यात हे सुद्धा दाखवलं आहे की पांढऱ्या खेळाडूचा घोडा हा काळ्या खेळाडूच्या राणी समोर आहे परंतु त्या दोघात काळा प्यादा सुद्धा आहे. राणी ही उडी मारू शकत नाही म्हणून ती प्याद्या जवळील काढलेल्या निळं वर्तुळा परियंत जाऊन थांबेल किंव्हा तीला घोड्याला मारण्यासाठीचा मार्ग बदलावा लागेल जे चित्रात हिरव्या खुणांनी दर्शविले आहे.



हत्ती (Rook) चित्र ८
हत्ती (Rook)

हत्ती हा
उभ्या आणि आडव्या दिशेने राणी सारखाच जाऊ शकतो परंतु तिरप्या दिशेनं जाऊ शकत नाही. हत्ती सुद्धा कोणत्याही सोंगटी वरून उडी मारू शकत नाही. त्याच्या मार्गात येणाऱ्या विरोधी खेळाडूच्या सोंगट्या तो मारू शकतो. चित्र ८ मध्ये हत्तीच्या चाली दाखवल्या आहेत आणि त्यात हे सुद्धा दाखविले आहे की काळ्या प्याद्याच्या आणि पांढऱ्या हत्तीच्या मध्ये सुद्धा पांढऱ्या खेळाडूचाच प्यादा आहे हत्ती हा कोणत्याही सोंगटी वरून उडी मारू शकत नाही म्हणून तो पांढऱ्या प्याद्याच्या जवळ काढलेल्या निळं वर्तुळा परियंत जाऊ शकतो किंव्हा काळ्या प्याद्याला मारण्यासाठी त्या हत्तीला मार्ग बदलावा लागेल जे चित्रात हिरव्या खुणांनी दर्शविले आहे.





उंट (Bishop) चित्र ९
उंट (Bishop)

उंट हा सुद्धा राणी सारखाच तिरप्या दिशेने जातो परंतु उभ्या आणि आडव्या दिशेने जात नाही. तिरप्या दिशेने जात असल्या कारणाने तो केवळ एकाच रंगाच्या चौरासावर चालत असतो. प्रत्येक खेळाडू पाशी एक पांढऱ्या चौरसावर चालणार तर एक काळ्या चौरसावर चालणार उंट असतो. उंट हा देखील त्याच्या मार्गात येणाऱ्या विरोधी खेळाडूच्या सोंगट्यांना मारू शकतो परंतु कोणत्याही सोंगटी वरून उडी मारू शकत नाही. चित्र ९ मध्ये उंटाच्या चाली दर्शवल्या आहेत काळ्या घोड्याच्या आणि पांढऱ्या उंटाच्या मध्ये पांढऱ्याचीच सोंगटी आली असल्या कारणाने उंट हा केवळ निळं वर्तुळाची खून केली असलेल्या जागे परियंत येऊ शकते किंव्हा त्या काळ्या घोड्याला मारण्यासाठी त्याला त्याचा मार्ग बदलावा लागेल जस चित्रात हिरव्या खुणांनी दर्शविले आहे.




घोडा (Knight) चित्र १०

घोडा (Knight)

घोड्याची चाल समजणे थोडं अवघडच आहे बुद्धिबळात केवळ घोडा ही अशी सोंगटी आहे जी सरळ चाल करत नाही ते केवळ अडीच पाऊले चालते म्हणजेच दोन सरळ चौरस आणि एक आडवे चौरस. चित्रात दिलेला मध्य भागी असलेला घोडा हा ८ चौरसांवर नियंत्रण ठेवतो. प्रत्येक चालीला घोड्याच्या चौरासाचा रंग बदलत असतो. चित्र १० मध्ये घोड्याच्या चाली दिल्या आहेत  दिलेली हिरवी वर्तुळे ही त्याची पुढची जागा आहे. केवळ घोडाच कोणत्याही सोंगटी वरून उडी मारू शकतो त्याच्या जागेवर येणाऱ्या विरोधी खेळाडूच्या सोंगट्या तो मारू शकतो.




प्यादी (Pawns) चित्र ११
प्यादी (Pawns)


प्रत्येक प्यादी (Pawns) हे पहिल्यांदा चाल करताना आपल्या सोयीनुसार दोन किंवा एक चौरस चालू शकते परंतु त्या नंतर ते केवळ एकच चौरस चाल करू शकते. प्यादी हे केवळ पुढेच जाऊ शकतात पुन्हा मागे येऊ शकत नाही. प्यादी एखाद्या विरोधी खेळाडूच्या सोंगटीला सरळ मारू शकत नाही ते केवळ तिरप्या दिशेला मारू शकतात. शेवटच्या Rank वर पोहोचताच तो प्यादा बदलून आपल्याला राणी, हत्ती, उंट, किंव्हा घोडा यांपैकी कोणतीही हवी ती एक सोंगटी मिळते. जास्तीत जास्त खेळाडूंची पसंती राणीलाच असते कारण आपल्याला माहीत आहे ती सर्वात शक्तिशाली आहे आणि कधीतरी चाली नुसार घोडा सुद्धा घेतला जातो. आपण चित्र ११ मध्ये पाहू शकतो की पांढऱ्या खेळाडूने प्यादा हा त्याच्या सोयी नुसार दोन चौरस चालवला आहे तो एक चौरस चाल सुद्धा करू शकत होता परंतु त्याने दोन चौरस चाल करून लवकरात लवकर पुढे जाणे पसंत केले त्या प्याद्याची प्रथम चाल झाल्या नंतर तो प्यादा आता केवळ एकच चौरस चालू शकेल. त्या नंतर  त्या प्याद्याच्या तिरप्या दिशेला काळ्या खेळाडूचा हत्ती आणि घोडा होता पांढऱ्या खेळाडूने हत्तीला मारले आणि पुढे आठव्या Rank वर जाऊन तो प्यादा राणी मध्ये बदलून गेला तुम्ही जेवढे प्यादी शेवटच्या Rank वर पोहोचवाल तेवढया राणी किंव्हा तुम्हाला हवं असलेली सोंगटी मिळेल राजा आणि प्यादा सोडून. चित्र १२ मध्ये पांढऱ्या खेळाडू ने प्रथम एक प्याद एक चौरस चालवला त्यावर उत्तर देत काळ्या खेळाडूने दोन चौरस प्याद्याची चाल केली पुन्हा पांढऱ्याने एक चौरस चालून दोन्ही सोंगट्याना Block केलं तसच पुढच्या चालीत काळ्याने दोन चौरस चाल केली त्यावर पांढऱ्याने सुद्धा दोन चौरस चाल करून तिथेही Block लावला. प्यादी केवळ सरळ चाल करत असतात म्हणून जेव्हा त्यांच्या समोर एखादा प्यादा आला की दोघांना ही पुढे जात येत नाही मग ते आहेत त्याच जागेवर उभे राहतात जोपरियंत त्यांना तिरप्या दिशेला मारता येत नाही.