बुधवार, ४ मार्च, २०२०

बुद्धिबळाचे काही बेसिक नियम | Basic Rules of Chess - in Marathi

इथे आपण पाहणार आहोत बुद्धिबळाचे काही नियम. 

1. En Passant (एन पासेंट)
2. Check (शह)
3. Checkmate (शह आणि मात)
4. Stalemate (स्टेलमेट)
5. Draws (ड्रो)


1. En Passant (एन पासेंट) 
En Passant

En Passant  हा एक असामान्य नियम आहे आणि केवळ प्याद्यांवर लागू होते. थोडं समजण्यासाठी अवघड जाईल. जेव्हा एखादा खेळाडू आपला प्यादा दोन चौरस पुढे चाल करतो तेव्हा जर विरोधी खेळाडूचा प्यादा शेजारी असला तर तो त्या प्याद्याने प्याद्यावर हल्ला करू शकतो. उदाहरणासाठी चित्रात दिलेला  काळ्या रंगाचा प्यादा हा d7 वरून d5 वर अशी दोन चौरासांची चाल करतो त्यावर पुढच्याच चालीत e5 वरचा पांढरा प्यादा हा त्या प्याद्यावर हल्ला करतो आणि d6 वर जातो. जणू काळ्या रंगाच्या प्याद्याने एकच चौरस चाल केली अस समजावं. परंतु हे केवळ पुढच्याच चालीत होऊ शकते नंतर हे शक्य नाही. 

2. Check (शह)
Check

राजाला मारलं जाऊ शकत नाही म्हणून कोणतीही सोंगटी जेव्हा राजावर हल्ला करण्याच्या स्थितीत येते तेव्हा विरोधी खेळाडू ला सावध करण्यासाठी शह (Check) बोलावचं लागतं. शह (Check) बोलल्यावर त्या खेळाडूला राजाला हलवावं लागतं किंवा त्या हल्ला करणाऱ्या सोंगटी ला मारावं लागतं अन्यथा चाल करून एखादी सोंगटी त्या दोघांच्या मध्य भागी आणावी लागतं जर हल्ला करणारा घोडा असल्यास मध्य भागी कोणतीही सोंगटी आणून उपयोग होणार नाही कारण घोडा हा इतर कोणत्याही सोंगट्यांवरून उडी मारू शकतो. चित्रात दिलेला पांढरा हत्ती हा काळ्या रंगाच्या g8 वरील राज्यावर हल्ला करण्यासाठी a4 वरून a8 वर आला आहे म्हणून पांढऱ्या खेळाडूला शह (Check) बोलणं अनिवार्य आहे.
  
3. Checkmate (शह आणि मात)
Checkmate

बुद्धिबळाचा डाव जिंकण्यासाठी राजावर मात करावी लागते आणि मात करण्यासाठी सापळा रचावा लागतो तरच या खेळात जिंकता येईल. मागेच आपण पाहिलं कि राजाला मारलं जाऊ शकत नाही. फक्त राजा ला घेराव घातला जातो म्हणजेच असा सापळा रचावा लागतो की त्यातून राजाने त्याची कुठलीही चाल केली तरी तो वाचू शकत नाही त्या वेळेस शह आणि मात बोलावचं लागतं (Check & mate or Checkmate) आणि डाव तिथेच संपतो. चित्रात दिल्या प्रमाणे पांढऱ्या खेळाडुने उंटाची चाल खेळून शह आणि मात (Checkmate) दिले कारण काळ्या रंगाच्या राज्याकडे कुठेही हलण्यास जागा नाही तसेच उंट देखील मारला जाऊ शकत नाही आणि त्याच्याकडे  राजा व उंट या दोघात एखादी सोंगटी ठेवण्यासाठी कोणतीही चाल नाही.

4. Stalemate (स्टेलमेट)
Stalemate

शह (Check) न देता जर एखाद्या खेळाडूकडे खेळण्यासाठी कोणतीही चाल नसेल तर अश्या परिस्थितीत स्टेलमेट होऊन खेळ रद्द होतो. चित्रात दिल्या प्रमाणे पांढऱ्या खेळाडूने सापळा रचला आहे परंतु काळ्या रंगाची चाली येताच खेळण्यासाठी एकही चाल नाही म्हणजेच एक प्यादा आहे तोही पुढे जाऊ शकत नाही कारण त्याच्या मार्ग घोड्याने अडवला आहे आणि राजा कुठेही हळू शकत नाही म्हणून चित्रात दिलेला हा खेळ रद्द झाला.

5. Draws (ड्रो)
Same position repeated three times


बुद्धिबळाचे सगळेच खेळ जिंकू किंवा हारू शकत नाही काही खेळ रद्द सुद्धा होतात. 

१. स्टेलमेट
२. दोन्ही खेळाडूंच्या सहमतीने खेळ रद्द करता येतो. 
३. तीन वेळा पटावर एक सारख्या स्थिती (Position) आल्या तर हा खेळ रद्द होऊ होतो.
४. जर मागच्या ५० चालीत एकही प्याद्यांची चाल झाली नसेल किंवा एकही सोंगटी मारली गेली नसेल तर हा खेळ रद्द होतो.
५. दोन्ही खेळाडूंचा फक्त राजा शिल्लक असेल तेव्हा सुद्धा हा खेळ रद्द होतो.