शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

बुद्धिबळाचा पट | Information about Chess board in Marathi


चित्र ३
बुद्धिबळाचा पट मांडण्याची पद्धत आता आपण पाहणार आहोत. पट मांडताना तो कसाही ठेऊ नये. नेहमी पट मांडताना खात्री करावी कि दोन्ही खेळाडूंच्या उजव्या कोपऱ्यातला चौरस हा पांढऱ्या रंगाचा असावा. अधिक समजून घेण्यासाठी चित्र ३ पहा. पटाच्या स्तंभांना 'a' पासून 'h' आणि पंक्तीना '1' ते '8' अशी नावे  आहेत हि नावे मिळून प्रत्येक चौरसाला एक अद्वितीय नाव देतात. 


चित्र ४
उदा. चित्र ४ मध्ये दिलेल्या पटावर एक प्यादा हा एका चौरसावर उभा आहे तो 'd' या स्तंभावर आणि '5' या पंक्तीत उभा आहे त्या चौरसाला 'd5' म्हणतात. खेळ रेकॉर्ड करण्यासाठी या नावांचा उपयोग केला जातो. बुद्धिबळ  खेळाडू याच्या सहाय्याने खेळ रेकॉर्ड करून त्या खेळाचा अभ्यास करतात आणि आपल्या  चुका सुधारतात. हा असा खेळ आहे जिथे तुम्हाला इतर खेळात उपयोगी पडणाऱ्या Video Camera व इतर साहित्यांची गरज पडत  नाही.

चित्र ५
 म्हणजेच तुमच्या चुका पाहण्यासाठी तुम्ही इतर खेळात Videos पाहता आणि इतर साहित्यांचा उपयोग करता व ती महागडी सुद्धा असतात पण बुद्धिबळात तुमच्या चुका पाहण्यासाठी तसेच तो डाव जपून ठेवण्यासाठी फक्त एक पेन आणि एका कागदाची गरज असते. हे एकून तुम्हाला नवलच वाटत असेल ना?  तर हे खर आहे. ते कसे रेकॉर्ड करतात ते आपण पुढच्या येणाऱ्या पोस्ट मध्ये पाहूच पण अगोदर प्रत्येक चौरसाला असलेली नावे कशी असतात ती लक्ष्यात ठेवा. सहाय्यासाठी चित्र ५ पहा.